जमिनीचे प्रकार आणि उपाययोजना soil type

Soil type
Soil type


soil type mpsc पूर्व परीक्षेमध्ये शेती या विषयावर काही प्रश्न विचारले जातात , या लेखात आपण pyq आधारित जमिनीचे प्रकार , वेगवेगळे बांध ,कृषी सम्बन्धी वेगवेगळ्या क्रांती आणि रेशीम उत्पादन या विषयी माहिती घेणार आहोत. महत्वाच्या घटनात्मक संस्था

जमिनीचे प्रकार 

 🔰चोपन जमीन/ अल्कलीयुक्त जमीन/Alkaline/sodic soil :

 Ph 8.5 - 10

या जमिनीमध्ये विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी असते व सोडियम कार्बोनेटे आणि बायकार्बोनेटे चे प्रमाण अधिक असल्यामुळॆ या जमिनीला उच्च अल्कलीधर्म प्राप्त होतो.

यामुळे या जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही, यामुळे हि पावसाळ्यात अतिशय चिबड व उन्हाळयात कोरडी झाल्यावर टणक बनते. जमिनीत हवा खेळती राहत नाही.'soil type'

 चोपन जमिनीत सुधारणा करण्यासाठी जिप्सम ,गंधक,आयर्न पायराइट्स, मळी या सुधार घटकांचा वापर करावा लागतो . 

शेणखत ,कंपोस्ट,या सारख्या सेंद्रिय खतांचा वापर तशेच आम्लयुक्त रासायनिक खते जसे कि अमोनियम सल्फेट ,सिंगल सुपर फॉस्फेट अशा खताचा वापर जमिनीसाठी चांगला असतो ..


 🔰खारवट जमीन/ क्षारयुक्त जमीन / saline soil : 

ph 8.5 पेक्षा कमी असतो,

या जमिनीच्या पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर असतो, या जमिनीत पाण्याचा निचरा होतो.
या जमिनीमध्ये विद्राव्य  क्षारांचे प्रमाण जास्त असते , यामुळे बी पेरल्यानंतर ते उगनवण्यसाठी आणि पीक वाडीसाठी धोका तयार होतो . 

या विद्राव्य क्षारामध्ये कॅल्शिअम,मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेट असते, या जमिनीत सुधारणा करण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणे.उदा : धैंचा 

या जमिनीत येणारी पिके : कापूस,ऊस,रताळे ,तांदूळ,ज्वारी,बाजरी,टोमॅटो,सूर्यफूल.

 🔰आम्ल जमीन / acidic soil

pH 7 पेक्षा कमी 

 ज्या भागात पाण्याचे प्रमाण जास्त त्या ठिकाणी अशी जमीन आढळते . तसेच नायट्रोजन युक्त खतांचा अतिवापर यामुळे जमीन आम्लयुक्त बनते. उदा: युरियाचा अतिवापर  . 

 या जमिनीत सुधारणा करण्यासाठी स्फुरदयुक्त खात, चुनखडी(calcium carbonate ) चा वापर करावा . स्फुरदाचे स्थिरीकरण (soil fixing ) या जमिनीत जास्त होते. 


 🔰चुनखडीयुक्त जमीन

pH 8 पेक्षा जास्त 

जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. 



जमीन बांध पद्धती :

पावसाचे पाणी वाहून जाऊ नये यासाठी बांध बांधण्यात येतात.

समतल बांध : 
कमी पावसाच्या भागात उपयोगी ,जमिनीत पाणी मुरवण्याचा वेग जास्त असेल तर साधारण 2 ते 3 % उताराच्या जमिनीवर फायदेशीर .'soil type'

ढाळीचे बांध :
 जास्त पावसाच्या प्रदेशात 2 ते 10 % उताराच्या जमिनीत आणि पाणी मुरण्याचा वेग कमी असलेल्या ठिकाणी बांधले जातात .

उपयोगी उपकरणे :

✅इंफिल्ट्रोमीटर : या उपकरणाचा उपयोग जमिनीतील पाण्याचा अंश मोजणीसाठी करतात.

इव्हॅपोरिमीटर/ औटमोमीटर  :या उपकरणाचा उपयोग  पाण्याच्या साठ्यातील पृष्ठभागावरील बाष्पीभवनाचा दर मोजणीसाठी करतात.

 सयक्रोमेटर या उपकरणाचा उपयोग ज वातावरणातील सापेक्ष आद्रता मोजणीसाठी करतात.

लायसिमीटर या उपकरणाचा उपयोग वनस्पतीद्वारे सोडल्या जाणाऱ्या एकूण बाष्पीभवनाचे मोजमाप  करण्यासाठी करतात.



          वेगवेगळ्या क्रांती आणि उत्पादन :


    •  हरित क्रांती   :   अन्नधान्य उत्पादन 

    •  निल क्रांती    :   मत्स्य उत्पादन 

    •  पीत क्रांती    :   तेलबिया उत्पादन 

    •  सुवर्ण क्रांती  :  फळे मधुमक्षिका उत्पादन 

    • कृष्ण क्रांती    :   पेट्रोलियम उत्पादन 

    •  करडी क्रांती   :   खत उत्पादन 

    •  श्वेत / धवल क्रांती  :  दुग्ध उत्पादन 

    •  गुलाबी  क्रांती  :   कोळंबी / कांदा / औषध /झिंगा  उत्पादन 

    • चंदेरी क्रांती   :   अंडी उत्पादन 

    • अमृत क्रांती    :   नद्याजोड प्रकल्प उत्पादन 

    • लाल क्रांती    :   टोमॅटो /मांस उत्पादन 

    •  सोनेरी क्रांती   :   ताग उत्पादन 

    • चंदेरीक्रांती    :   कापूस उत्पादन 
    •   
    •  इंद्रधनुष्य क्रांती   :  कृषी क्षेत्रातील सर्वांगीण विकास उत्पादन 

    रेशीम प्रकार : 


    भारतामध्ये 97 % रेशीम उत्पादन कर्नाटक ,आंध्रप्रदेश ,तामिळनाडू,बिहार आणि आसाम या राज्यात होते . 

    भारतात 4 प्रकारचे रेशीम उत्पादन होते :1) मलबेरी 2) इरी 3)टसार 4)मुगा  ''soil type''

    यात सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यात होते . तुती,एरंड ,ओक या झाडावर रेशीम किडे गुजराण करतात .govt schemes for prelims

     मुगा रेशीमचे उत्पादन आसाम व बिहार राज्यात होते.  याला GI tag भेटलेला आहे. 

    मलबेरी  silk : देशातील ८०% रेशीम उत्पादन याचे होते ,हे कर्नाटक,आंध्रप्रदेश ,ता,तामिळनाडू येते उत्पादित केले जाते.

    इरी  रेशमाला इंडी किंवा एरंडी म्हणतात. याला शांतीचे कापड  किंवा अहिंसा कापड  म्हणतात, कारण या रेशमाचे उत्पादन किडयाला न मारता घेतले जाते .

    याचे आसाम व पूर्वोत्तर राज्ये , बिहार , बंगाल ,ओडिशामध्ये घेतले जाते.

    टसार :  हे सोनेरी रंगासाठी प्रसिद्ध आहे.
    याचा उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
     याचे उत्पादन झारखंड,छत्तीसगढ,मध्यप्रदेश,येथे घेतले जाते.

    माहिती कशी वाटली कंमेंट करून नक्की कळवा.
     धन्यवाद .
     .......................Share🙏🙏🙏🙏🙏

    Post a Comment

    0 Comments