Mpsc weekly current affairs aug 2023

 🔆उल्लास ULLAS (Understanding Lifelong Learning for All in Society) 

 ✅ हे कार्यात्मक साक्षरता, व्यावसायिक कौशल्ये आणि आर्थिक साक्षरता, कायदेशीर साक्षरता, डिजिटल साक्षरता आणि देशाच्या राष्ट्र उभारणीत सहभागी होण्यासाठी नागरिकांचे सक्षमीकरण यासारख्या अनेक महत्त्वाच्या जीवन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करेल.

 ✅ हे 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना संधी देते ज्यांनी शाळेत जाण्याची संधी गमावली आहे. 

 ✅ हे NCERT च्या DIKSHA पोर्टलद्वारे विविध शिक्षण संसाधनांमध्ये सहभागी होण्याऱ्या विध्यार्थ्यांसाठी डिजिटल माध्यम आहे. 


🔆व्हाइट लेबल एटीएम (WLA):-

 ✅हे बँक नसलेल्या संस्थांची  मालकी असलेले आणि ऑपरेट केलेले एटीएम आहेत.

 ✅कंपनी कायदा 1956 अंतर्गत भारतात समाविष्ट केलेल्या बिगर-बँक संस्थांना WLA चालवण्याची परवानगी आहे.

 ✅2015: सरकारने स्वयंचलित मार्गाने 100% पर्यंत FDI ला परवानगी दिली.

 ✅ अशा गैर-बँक संस्थांची किमान संपत्ती 100 कोटी रुपये असावी.

 ✅टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड (टीसीपीएसएल)TCPSL ही देशात व्हाईट लेबल एटीएम उघडण्यासाठी आरबीआयने अधिकृत केलेली पहिली कंपनी होती.

 ✅ WLA ची भूमिका: विद्यमान अधिकृत, सामायिक एटीएम नेटवर्क ऑपरेटर किंवा कार्ड पेमेंट नेटवर्क ऑपरेटरसह तांत्रिक कनेक्टिव्हिटी स्थापित करून सर्व बँक ग्राहकांचे व्यवहार सक्षम करणे.


 ‘उन्मेषा’ आणि ‘उत्कर्ष’ सण

 ▪️उन्मेषा - आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी भोपाळ मध्यप्रदेश येथे उदघाटन केले. 

 ✅ हा भारतातील सर्वात समावेशक आणि भाषांच्या संख्येच्या दृष्टीने आशियातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव आहे.

 ✅ 102 भाषांमध्ये 575 हून अधिक लेखक सहभागी होणार असून, हा जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव बनणार आहे.

 ✅महोत्सवामध्ये कविता आणि कथा वाचनासह महासागर साहित्य, पर्यावरणशास्त्र, यंत्रे आणि साहित्य, भारताची कल्पना, सर्जनशीलता वाढवणारे शिक्षण आणि अनुवाद यावर चर्चा समाविष्ट असेल.


 ▪️उत्कर्ष - लोक आणि आदिवासी कला सादरीकरणाचा उत्सव :

 ✅हा उत्सव आदिवासी लोकांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या कला प्रकारांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यांची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी आहे.


🔆राजमार्गयात्रा App

 ✅याचा उद्देश हायवे वापरकर्त्यांसाठी अखंड, वापरकर्ता-अनुकूल अनुभव निर्माण करणे, भारतीय राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षित आणि अधिक आनंददायी प्रवासाला चालना देणे हे आहे.

 ✅ हे अॅप भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) लाँच केल.


🔰 महसूल सप्ताह महाराष्ट्र शासन

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट


🔰 मेजर लीग स्पर्धा 2023


🔆देशात सर्वप्रथम नागपूर विभागात ई-पंचनाम्याचा प्रयोग.


 🔆पाचवी जागतिक कॉफी परिषद 2023

(बंगलोर, कना॑टक) पहिल्यांदाच भारतात होणार. 

शुभंकर : कॉफी स्वामी

सदिच्छा दुत : रोहन बोपन्ना


सिनेमॅटोग्राफ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर

सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 मध्ये सुधारणा करून पायरसी विरोधी व्यापक आळा घालण्यात आला. तसेच चित्रपट परवाना 10 वर्ष होता यात सुधारणा करून आजीवन परवाना वैध करण्यात आला. 




Post a Comment

0 Comments