राजकीय पक्ष Political parties

 
राजकीय पक्ष  Political parties
राजकीय पक्ष  Political parties 

राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळवण्यासाठी अटी

1. 4 किंवा अधिक राज्यांमध्ये राज्यपक्षाचा  दर्जा असेल.     

किंवा 

3. एकूण लोकसभेच्या जागांपैकी किमान 2% किमान 3   

   राज्यांमधून निवडून येणे आवश्यक.

2. जर त्याच्या उमेदवारांनी किमान 4 राज्यांमधून (नवीनतम 

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत) एकूण वैध 

मतांपैकी किमान 6% मते मिळवली असतील आणि गेल्या

लोकसभा निवडणुकीत पक्षाकडे किमान 4 खासदार असतील

 तर ते राष्ट्रीय पक्ष म्हणून पात्र होतात.

2024 मध्ये राष्ट्रीय पक्ष दर्जा असलेले पक्ष :

1 भारतीय जनता पक्ष (BJP) 1980

2 बहुजन समाज पक्ष (BSP) 1984

3 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) 1885

4 मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष (CPI-M) 1964

5 आम आदमी पक्ष (AAP) 2012

6 नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) 2013 

 #2024 मध्ये पुढील पक्षांनी राष्ट्रीय पक्ष दर्जा गमावला :

1. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) 1925

2. तृणमूल काँग्रेस ( TMC) 1998

3. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) 1999


#राज्य पक्ष दर्जा मिळवण्यासाठी अटी :

1.संबंधित राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत

 राज्यात मतदान झालेल्या वैध मतांपैकी 6% आणि त्याच

 राज्याच्या विधानसभेत 2 जागा जिंकल्यास

किंवा

2. जर ते लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यातील

 एकूण वैध मतांपैकी 6% मिळवले आणि त्याच राज्यातून

 लोकसभेत एक जागा जिंकली.

किंवा

3. संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत

विधानसभेतील 3% जागा किंवा विधानसभेच्या 3 जागा (जे

जास्त असेल) जिंकल्यास.

किंवा

4. प्रत्येक  25 जागां मागे लोकसभेची किमान 1 जागा

 जिंकला असल्यास (संबंधित राज्यात)

किंवा

5. राज्यातून लोकसभा किंवा राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक

निवडणुकीत राज्यात मतदान झालेल्या एकूण वैध मतांपैकी

8% मते मिळवल्यास.  

राज्य पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा मिळतो.

#2016 पासून निवडणूक आयोगाद्वारे एखाद्या पक्षाचा दर्जा

 दर 10 वर्षांनी पडतळला जातो.


Post a Comment

0 Comments