UNFPA (United Nation Population Fund) ही एक युनायटेड नेशन ची विशेष संस्था आहे.
नुकतेच UNFPA ने स्टेट ऑफ वर्ल्ड पॉपुलेशन रिपोर्ट 2024 प्रसिद्ध केला. जो दरवर्षी प्रकाशित केला जातो.
यात जगातील लोकसंख्या, लोकसंख्या विशेष घडामोडी तसेच विविध देश विशिष्ठ प्रदेश तेथील लोकसंख्या यांचे विश्लेषण केले जाते, तसेच तेथील लोकसंख्येला द्याव्या लागणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला जातो.
UNFPA जागतिक लोकंख्या 2024
अहवाल :
इंटरव्होवन लाईव्ह, थ्रेड्स ऑफ होप : एंडिंग इनेक्वलिटी इन सेक्शुअल अँड रिप्रॉडक्टिव हेल्थ अँड राईट्स.
विशेष मुद्दे :
1. UNFPA च्या अहवाला नुसार भारताची लकसंख्या अंदाजे 144 कोटी झाली आहे.
2. पुढील 77 वर्षात भारताची लोकसंख्या दुप्पट होईल असा अंदाज UNFPA अहवाल सांगतो.
3. अहवालानुसार भारत 144.17 कोटी लोकसंख्येनुसार जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तर चीनची लोकसंख्या 142.5 कोटी आहे.
4. भारतात 2011 साली झालेल्या लोकसंख्या गनणेनुसर 121 कोटी लोकसंख्या होती.
5. UNFPA अहवालानुसार 24% लोक 0-14 वयोगटातील आहेत.
6. 17% लोक 10-19 वयोगटातील आहेत.
7. 26% लोक 10-24 वयोगटातील आहेत.
8. 68% लोक 15-64 वयोगटातील आहेत.
9. भारतातील लोकसंख्यापैकी 7% लोक 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत.
10. पुरुषांचे आयुर्मान 71 वर्ष तर महिलांचे 74 वर्ष आहे.
11. 2006-2023 दरम्यान 23% लोकांचे बालविवाह झाले असे अहवाल सांगतो.
12.अहवालानुसार लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्यमध्ये भारताच्या प्रगतीच्या 30 वर्ष मध्ये जागतिक स्तरावर सर्वात दुर्लक्षित समुदायकडे दुर्लक्ष्य केले आहे.
13. भारतातील माता मृत्यू प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. जे जागतिक माता मृत्यू प्रमाणाच्या 8% आहे.
14. आदिवासी महिलांचे माता मृत्यू प्रमाण जास्त आहे.
0 Comments
This is not government official website.this information only for educational purpose.